कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्वच्छता मोहीम मार्गदर्शन शिबिर

पुणे :  कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत बावधन खुर्द अणि  बुद्रुक आरोग्य कोठी अंतर्गत सफाई अपनाओ बीमारी भगाओ स्वच्छता मोहीम स्वच्छ सर्वेक्षण 2024च्या मोहीम मध्ये  रहिवाशी नागरिक, शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग  यांना सार्वजनिक शौचालयाची नियमित स्वच्छ्ता राखणे, व तसेच गावठाण परिसरामध्ये  साथीचे रोग , इतर जलजन्य रोग या पासून बचाव बाबत जनजागृती मोहीम राबवून वैयक्तिक शारीरिक स्वच्छता विषयी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले..

 तसेच पुणे महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापननाचा नंबर सुद्धा नागरिकां मध्ये प्रचार करण्यात आला. यावेळी सदर आरोग्य निरीक्षक हनुमंत चाकणकर, सचिन लोहकरे , जया सांगडे , सूरज पवार, संतोष ताटकर, गणेश चौधे, गणेश साठे, लक्ष्मीकांत कुलकर्णी करण कुंभार,रुपाली शेंडगे, मुकादम राम गायकवाड, बापु वाघमारे, वैजनाथ गायकवाड  अशोक कांबळे, अण्णा डावरे, विजय पाटील ,सफ़ाई कर्मचारी वर्ग , बावधन येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा क्रमांक २ . यांच्याकडील मुख्याध्यापिका मनीषा पाटील मॅडम व शाळेतील शिक्षक वर्ग ,प्रकृति वेस्ट मैनेजमेंट ,स्वच्छ सहकारी सेवा संस्था, जनसुविधा सोशल फौंडेशन प्रतिनिधी   उपस्थित होते.

महा.अति.आयुक्त पुणे मनपा पृथ्वीराज साहेब, मा.उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन श्री.संदीप कदम, मा.उपायुक्त परिमंडळ क्र.०२ श्री.गणेश सोनूने, मा.महापालिका सहाय्यक आयुक्त मा.श्री.प्रकाश मोहित, यांच्या आदेशानुसार तसेच वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री.राम सोनावणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला.

See also  यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आणि जतन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बेकरी रोड, धनकवडी येथे मोफत श्रवणयंत्र तपासणी व चष्मे वाटप