मराठी माणसाच्या कतृत्वाने भाषेला झळाळी मिळेल व अभिजात मराठी भाषा हा दर्जा सार्थकी लागेल : संत साहित्याचे जेष्ठ आध्यापक मा डाॅ सदानंद मोरे

पुणे : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने मराठी भाषेला अभिजात दर्जा’ प्राप्त झाल्यानिमित्त जल्लोश मराठीचा  हा विशेष कार्यक्रम करण्यात आला होता पण पद्मविभूषण उद्योगपती श्री रतन टाटा हे कालवश झाल्याने हा कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्यात आला.


माॅडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर पुणे ५ या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डाॅ राजेंद्र झुंजारराव यांच्या ‘मोहोर’ या ८व्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी मा स्नेहल तावरे, स्नेहवर्धन प्रकाशन यांचा सत्कार संस्थेच्या सहकार्यवाह प्रा डाॅ जोत्स्ना एकबोटे यांच्या हस्ते करण्यात आला.


या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा डाॅ सुरेश गोसावी आणि संत साहित्याचे जेष्ठ आध्यापक मा डाॅ सदानंद मोरे उपस्थित होते.
या प्रासंगी संस्थेचे कार्याध्यक्ष डाॅ गजानन र एकबोटे म्हणाले,”देशाच्या पातळीवर मराठी भाषा श्रेष्ठ आहे व भाषेचे श्रेष्ठत्व मराठी तरुणांच्या हातात आहे. मराठी भाषेला जागतिक पातळीवर नेण्यासाठी तरुणाईने पुढाकार घेतला पाहिजे.’
या प्रसंगी डाॅ सुरेश गोसावी म्हणाले,” मराठी, प्राकृत, पाली आणि आणखी दोन भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी  विद्यापीठाने पुढील 25 वर्षाचा विकास आराखडा तयार केला आहे तसेच  आंतरराष्ट्रीय मराठी केंद्र स्थापन केले आहॆ. महाराष्ट्रातील विद्यापीठे आणि महाविद्यालय मिळून  मराठी पुस्तके लिहिण्याचा प्रकल्प विद्यापीठ राबवत आहे, हा सर्व मराठी जनांचा  गौरव आहे”


या प्रसंगी डाॅ सदानंद मोरे  म्हणाले,” मराठी माणसाचे कर्तृत्व वाढले की भाषा वाढेल. मराठीच्या दिर्घ इतिहास कथन करताना  ते म्हणाले मराठी ही साहित्य, दरबार, आणि धर्माची भाषा होती. मराठयांच्या दरबाराची भाषा मराठी होती आणि लिपी मोडी. महाराष्ट्री प्राकृत मधून मराठी तयार झाल्याचे मत त्यांनी मांडले. संस्कृत हे प्राकृत चे रिफायन स्वरूप आहे . दांते च्या डीवाइन कॉमेडीच्याही अगोदर आपल्या कडे ज्ञानेश्वरी लिहिली गेली.”
कार्यक्रमाची सुरवात सौ स्वाती पटवर्धन, सौ वैशाली ब्रम्हे , सौ क्षिप्रा पंढरपुरे , सौ रेणु भालेराव व सौ शिर्के यांनी महाराष्ट्र गीत व समूह गीत यांच्या गायनाने झाली.

या कार्यक्रमात जेष्ठ शिक्षणतज्ञ व साहित्यिक डाॅ न.म.जोशी यांचा सत्कार झाला.
कार्यक्रमाची सांगता श्री जितेंद्र भुरुक प्रस्तुत ‘ सुर तेची छेडिता’ या सांगितीक कार्यक्रमाने झाली.
या कार्यक्रमाचे सूत्र संचलन डाॅ वैजयंती जाधव यांनी केले.पाहुण्यांचा परिचय संस्थेच्या उपकार्यवाह प्रा डाॅ निवेदिता एकबोटे यांनी करुन दिला. आभार प्रदर्शन संस्थेचे कार्यवाह प्रा शामकांत देशमुख यांनी केले.
या प्रसंगी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सर्व सदस्य, आजीव कार्यकर्ता मंडळाचे सर्व सदस्य, आजीव सदस्य मंडळाचे सर्व सदस्य तसेच संस्था संचलित सर्व शाळा-महाविद्यायाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, संचालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी असे सर्व उपस्थित होते.

See also  औंध मध्ये गुन्हेगारी शून्यावर आणून नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणार - पोलीस आयुक्त अमितेश कुमार