औंध मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला कायम स्वरुपी पोलीस संरक्षण देण्यात यावे -रमेश ठोसर

औंध : औंध मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला कायम स्वरुपी पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री व गृहमंत्री महाराष्ट्र यांच्याकडे ईमेल व पोस्टा मार्फत रिपब्लिकन पक्षाच्या औंध विभागाच्या वतीने करण्यात आली.

औंध येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला भविष्य काळात अनुचित प्रकार घडू नये म्हणून कायम स्वरुपी पोलीस संरक्षण देण्यात यावे असे   रिपब्लिकन पक्षाच्या औंध विभागाच्या वतीने  देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे मागणी   केली आहे असे ‌रमेश ठोसर नेते रि पा इं पुणे शहर, यांच्या पत्रकान्वये व स्थानिक नागरिक व कार्यकर्ते   योगेश भोसले, विशाल कदम, कैलास  ठोसर, अनिल राक्षे,  प्रविण ठोसर  यांच्या सह्या द्वारे केली मागणी केली.

See also  होर्डिंगची उंची व रुंदी याचे ऑडिट करण्यासाठी शासनास निर्देश द्यावे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा लक्षवेधी चर्चेत सहभाग ; महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन