NCL पूर्वप्राथमिक व प्राथमिक  विभागाकडून आषाढी पालखी सोहळा उत्साहात साजरा

पाषाण : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या NCL पूर्वप्राथमिक व प्राथमिक  विभागाकडून आषाढी पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.


यासाठी शाळेच्या व्हिजिटर सौ मोनिका वैद्य (पूर्वप्राथमिक विभाग आणि प्रा.डॉ. संजय खरात यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
लहान लहान चिमुकल्यांनी विविध संतांच्या वेशभूषा करून शाळेचे वातावरण प्रफुल्लित केले.


नंतर पालखीत ठेवलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ आरती तरडे  यांनी केले.
मोठ्या थाटात लहान मुलांनी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी खांद्यावर घेऊन शाळेभोवती प्रदक्षिणा केली. त्यात मुलांनी टाळ आणि टाळ्या वाजवून श्री विठ्लाच्या नामाचा गजर करत जय जय
रामकृष्ण हरी असा जयघोष केला. चांगल्या सवयी अंगिकारण्या साठीचे आणि स्वच्छते संदर्भातले फलक हाती घेऊन मुलांनी समाजाला चांगल्या वागणुकीचा संदेश सुध्दा दिला.
प्रदक्षिणा झाल्यावर प्रत्येक विद्यार्थ्याला राजगिरालाडू प्रसाद म्हणून देण्यात आला आणि अशा प्रकारे चिमुकल्यांच्या पालखीची सांगता करण्यात आली.

See also  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणालीचा शुभारंभ