रयत शिक्षण संस्थेच्या चं. बा. तुपे साधना कन्या विद्यालयात १९९७ च्या बॅचच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा


हडपसर : रयत शिक्षण संस्थेच्या चं.बा.तुपे साधना कन्या विद्यालय , हडपसर शाखेत १९९७ या वर्षी दहावी उत्तीर्ण बॅचचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि ( या विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी) सौ रुपाली चाकणकर आणि पश्चिम विभागीय अधिकारी ,रयत शिक्षण संस्था ,किसनराव रत्नपारखी, विद्यालयाच्या प्राचार्या सुजाता कालेकर, पर्यवेक्षक नितीन सोनावणे,‌ मंदाकिनी शिंदे, छाया पवार, माजी मुख्याध्यापक व शिक्षक शशिकला साळुंखे.शशिकला वायदंडे, आसावरी वाल्हेकर, ज्योती बुद्रुक,विमल कुदळे, आसावरी मुळे, मंदाकिनी कानडे,छाया कुंभार,विमल ठिगळे, प्रद्युम्न उपाध्ये सुनिल झिरपे, रघुनाथ जाधव, जाखडे सर, अशोक वाल्हेकरसर, तुपे ताई व माजी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.

या स्नेहमेळाव्यास १४७ विद्यार्थिनी प्रत्यक्ष आणि ऑनलाईन झूम मिटींगद्वारे परदेशातून १८ विद्यार्थिनी उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल शिंदे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाच्या प्राचार्या सुजाता कालेकर व अनुराधा गेजगे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार ‌नेत्रा कालकुंद्री यांनी मानले . नियोजन कमिटीमध्ये वर्षा कारले, प्रतिभा रासकर, कांचन रासकर, संगीता लाड , शुभांगी चव्हाण.शितल झोडगे , माधुरी भंडलकर, अमृता कालकुंद्री, नेत्रा कालकुंद्री,सारिका खपजेवार, ज्योती कदम‌ या विद्यार्थिनीनी काम केले.माजी विद्यार्थिनी अमिता निकम व स्वाती घाडगे यांनी मनोगत व्यक्त केले.शिक्षक मनोगतामध्ये रघुनाथ जाधव , शशिकला सांळुखे, नितीन सोनावणे, मिनाक्षी वायदंडे यांनी उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास आमदार चेतन तुपे, दिलीप तुपे, व सहाय्यक आधिकारी शंकर पवार यांनी शुभेच्छा दिल्या.

See also  चोरी झालेले प्रात्यक्षिकासाठीचे ईव्हीएम कंट्रोल युनिट पोलिसांनी केले जप्त