बाणेर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर यांच्या वाढदिवसानिमित्त व रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना सरंजाम वाटप कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक 22 मार्च रोजी कुंदन गार्डन बाणेर येथे डॉ. दिलीप मुरकुटे पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मुस्लिम बांधवांना सरंजाम वाटप परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सुस महाळुंगे बाणेर बालेवाडी परिसरातील हजारो मुस्लिम बांधवांना यावेळी रमजान ईद निमित्त सरंजा वाटप करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेनेचे डॉ. दिलीप मुरकुटे, शिवसैनिक, पदाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत
कार्यक्रमाच्या ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले असून सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली असल्याचे डॉ. दिलीप मुरकुटे यांनी सांगितले.
घर ताज्या बातम्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या वतीने बाणेर येथे...