नागरिकांशी जनसंवाद कार्यक्रमाचे पोलीस स्टेशन अंतर्गत आयोजन करण्यात यावे नाना वाळके यांची मागणी

औंध : औंध परिसरामध्ये नागरिकांची पोलिसांच्या मनातील भीती कमी होण्यासाठी तसेच नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनसंवाद नागरिकांशी या उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाना वाळके यांनी केली.

चतुःशृंगी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे  यांना याबाबत निवेदन देण्यात आले.नागरिकांच्या प्रश्नासाठी प्रत्येक महिन्यातील एक दिवस जनसंवाद नागरिकांशी उपक्रम चालू करावा. तसेच औंध बाणेर परिसरातील गुन्हेगारी घटनांची माहिती नागरिकांना यासाठी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन परिसरामध्ये तक्रार पेटी लावण्यात यावी.

नागरिकांशी सुसंवाद साधून पोलीस व नागरिक यांच्या माध्यमातून परिसरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी नागरिकांच्या संवादाचे कार्यक्रम घेण्यात येतील तसेच तक्रार पेटी देखील लावण्यात येईल असे आश्वासन दिले.

See also  भाजपा उमेदवार चंद्रकांत पाटील पाषाण, बाणेर सोमेश्वरवाडीतील ग्रामदैवतांच्या दर्शनाला, ग्रामस्थांकडून जोरदार स्वागत;केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची देखील उपस्थिती