औंध येथे मुळाई दीपोत्सव गंगा आरती

औंध : दरवर्षी प्रमाणे औंध मुळा नदी तीरावर कार्तिक पौर्णिमे निमित्त दीपोत्सव गंगा आरती करण्यात आली. नदीप्रदूषण हा गंभीर सर्वव्यापी विषय नदी विषयी श्रद्धा जागरण करून लोकसहभागातून सोडवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

गंगा ,नर्मदा ,इंद्रायणी ,गोदावरी ,भीमा ,कृष्णा , कावेरी, मुळा, मुठा, पवना, रामनदी या नद्यांचे पाणी पूजनासाठी उपलब्ध
गंगा नर्मदा मुळा या नद्यांचे स्तोत्र आरती तसेच भारतमाता पुजन यानिमित्त केले.
आपल्या संपर्कातील नदी प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना संस्थांना विद्यार्थी पालक शाळा गणेशोत्सव मंडळे यांना जागृत करून नदीविषयी श्रद्धाभाव वाढवून नदी प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचे सर्व नदी प्रेमी नागरिकांनी ठरविले आहे.
या निमित्त आपल्या घरातील प्लास्टिक कचरा एकत्र करणे रसायनीक वस्तूंचा वापर टाळून पर्यावरणस्नेही उत्पादने खरेदी करणे त्यांचा वापर दैनंदिन जीवनात करणे प्रदूषणा बाबत जनमताचा रेटा वाढवणे नदीमाता , गायमाता , तुलसीमाता , भूमाता याविषयक श्रद्धा जागरण करून प्रदुषणमुक्त जीवनशैली अंगीकार करणे याविषयक जनजागरण साठी मुळाई दीपोत्सव गंगा आरती चे आयोजन करण्यात आले.


शिवछत्रपतींच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त पुण्यातील तरुणांनी लद्दाख ते कन्याकुमारी सायकल प्रवास केला या प्रवासात त्यांनी विविध नद्यांचे पाणी संकलित केले त्या पवित्र जलाचे पुजन या निमित्त नागरिकांनी केले. आणि शिववंदना करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमास औंध परिसरातील दोनशे नागरिक उपस्थित होते.

See also  पुणे महापालिकेच्या ९३ रजा मुदत शिक्षकांच्या वर्षाखेरचा आनंद द्विगुणित