इंदापूर तालुका शालेय कुस्ती स्पर्धा पुन्हा घेण्यात यावे – संभाजी पवार

पुणे : इंदापूर येथे कै. रंगनाथ मारकड कुस्ती केंद्र झालेल्या शालेय कुस्ती स्पर्धा या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अधिकृत पंचांच्या अधिपत्याखाली झाल्या नसल्याने या स्पर्धा रद्द करण्याची मागणी संभाजी भरत पवार यांनी क्रीडा व युवक सेवा संचनालय आयुक्त यांच्याकडे केली.

इंदापूर येथे झालेल्या 14 ,17 व 19 वर्षाखालील तालुका कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अधिकृत पंच उपस्थित नव्हते. इंदापूर तालुका क्रीडा अधिकारी साखरे मॅडम यादेखील या स्पर्धेत उपस्थित नव्हत्या. स्पर्धा ज्या ठिकाणी झाल्या त्याच कुस्ती केंद्रातील प्रशिक्षकांनी पंच म्हणून काम पाहिले. तसेच शासनाचे अधिकृत क्रीडा संकुल असताना देखील या ठिकाणी स्पर्धा झाल्या नाहीत. यामुळे इंदापूर तालुक्यातील स्पर्धा या नियमांमध्ये बसत नाहीत.

सदर तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा या रद्द करण्यात याव्यात व पुन्हा नव्याने निवड चाचणी घेण्यात यावी अशी मागणी संभाजी भरत पवार यांनी केले असून यावर योग्य कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

See also  मराठमोळ्या सुविधा कडलग यांची माऊंटएव्हरेस्टला गवसणी