मराठी भाषेसाठी धानोरी येथे दुकानदाराला मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचा खडकी कोर्टातून जामीन मंजूर

खडकी : मराठी यायलाच पाहिजे म्हणत धानोरी परिसरात औषध दुकानदाराला मारहाण झालेल्या आरोपा संदर्भात गुन्हा दाखल झालेले महाराष्ट्र सैनिक श्री गणेश पाटील -सचिव -मनसे शिक्षक सेना, श्री अरुण येवले -शहरअध्यक्ष मनसे जनधिकार सेना, श्री.अच्युतरावं मोलावडे -उपसंघटक, श्री.मनोज ठोकळ -उपविभागध्यक्ष, श्री.कृष्णा मोहिते -सरचिटणीस मनसे कामगार सेना, कु.सिद्धांत पावसे यांना खडकी कोर्टातून जामीन मंजूर करण्यात आला

महाराष्ट्र सैनिकांतर्फे ॲड अरुण लंबगोळ, ॲड सुनील जपे, ॲड आकांक्षा जपे यांनी काम पाहिले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण, बाळासाहेब शेडगे, अंकुश तापकीर, नरेंद्र तांबोळी, गोकुळ अडागळे, सुनील कदम, विनायक कोतकर, विजय बेल्हेकर, सुबोध घोडके व शहरातील मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न