आम आदमी पार्टीच्या पाठपुराव्यातून सुस महाळुंगे परिसरातील ड्रेनेज लाईनच्या कामाला सुरुवात

सुस : म्हाळुंगे सुसगाव शिव रस्त्यावर पायगुडे नगर परिसरातील निलांचल सोसायटी, संजीवनी संगम सोसायटी, यशवीन, यशवीन आनंद, यशवीण ऑर्किड, साई सृष्टी, तीर्थ टॉवर्स, सारथी सोवीनियर, विबग्योर शाळा समोर ड्रेनेज लाइन नसल्यामुळे नागरिकांना वाहतुकीचा त्रास, तसेच दुर्गंधी आणि पावसाळ्यात चिखलाचा त्रास होतो आहे. आपचे प्रभाग अध्यक्ष  नितीन पायगुडे यांनी पाठपुरावा करून, पालिकेमार्फत ड्रेनेज लाइन, मलनिःसारण नाली याचे काम मंजूर करून घेतले.

या कामाचे उद्घाटन आप पुणे शहर अध्यक्ष श्री सुदर्शन जगदाळे आणि श्री काका पायगुडे यांच्या हस्ते नवीन मलनिःसारण नाली चे उद्घाटन केले. यावेळी नितीन पायगुडे, प्रदीप पायगुडे, सोहम पायगुडे ,विश्वनाथ पायगुडे ,राज पायगुडे, कल्पेश पायगुडे, अर्जुन पायगुडे, भावेश पायगुडे ,रविकिरण राव, रितेश निकाळजे, राहुल निकाळजे, गौतम कांबळे, नवनाथ गायकवाड, नाथा राव उपस्थित होते.

हा भाग 4 वर्षापूर्वी पुणे शहर हद्दीत समाविष्ट करून घेतला आहे. पालिका आणि राज्यसरकार च्या ढिसाळ कारभारामुळे अजून डीपी सुद्धा मंजूर नाही. या भागात मोठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्य करत आहे. ड्रेनेज बरोबरच पाणी, रस्ते, कचऱ्याच्या सुद्धा समस्या उद्भवत आहेतं. सुविधा नसूनही नागरिकांना मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागत आहे. पुढील काळात आप स्वतः लक्ष घालून नागरिकाबरोबर आंदोलन करून काम करून घेईल असे पुणे शहर अध्यक्ष श्री सुदर्शन जगदाळे यांनी सांगितले.
नागरिकांनी श्री नितीन पायगुडे यांचे आभार मानले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.




आम आदमी पार्टी
बाणेर बालेवाडी सुस म्हाळुंगे प्रभाग मीडिया

See also  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्‍या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे विनम्र अभिवादन