मुळशी तालुक्यातील सुस परिसरात अवैध डोंगरफोड तर मुठा खोऱ्यात अवैध माती उत्खनन

सुस : मुळशी तालुक्यातील अनधिकृत डोंगर फोडी व माती चोरीचे प्रकार सर्रास घडत आहेत. परंतु यावर योग्य कारवाई होत नसल्याने मोठ्या प्रमाणात अवैध खणन केले जात आहेत.

मुळशी तालुक्यातील मुठा खोऱ्यातील डोंगरावर खोदकाम करून माती विकण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच जेसीबीच्या व डंपरच्या सहाय्याने माती काढली जात आहे. तर सुसगाव महादेव नगर भगवती नगर परिसरात डोंगर फोड करण्यात आली आहे. तसेच शेकडो ब्रास मुरुम अवैध रितीने विक्री केली जात आहे.

गौण खनिज विभागाची परवानगी न घेता खोदकाम होत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बडवला जात आहे. तसेच पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून यामुळे या परिसरातील जैवविविधतेवर देखील परिणाम होत आहे. महसूल विभागाच्या निदर्शनास अवैद्य खोदकाम आणि देखील कारवाई होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अवैद्य खोदकामांना कोणाचा वर्ग असतो आहे याची चौकशी करण्यात यावी तसेच दंडात्मक कारवाई करून पर्यावरण होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

See also  अदानी एअरपोर्ट देशातील इतर आणखी एअरपोर्ट मिळवण्यासाठी लावणार बोली.