स्मार्ट सिटी मध्ये  विजेचे वाढीव बिल, छायाचित्र न घेता बिल आकारणी आणि नियमित वीजचा पुरवठा खंडित होत आहे, यावर कारवाई करावी

बाणेर : स्मार्ट सिटी भागात बाणेर बालेवाडी, सुसगाव म्हाळुंगे नियमित वीज पुरवठा खंडित होत आहे. व्होल्टेज fluctuation खूप मोठ्या प्रमाणत होत आहे. त्यामुळे विद्युत उपकरणे जळतात, बिघडतात.
अनेक ग्राहकांना वाढीव बिल मिळत आहेत, त्याचे नंतर परतावे घेण्यासाठी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. अनेक ठिकाणी मीटर चे छायाचित्र न घेता बिल आकारणी केली जाते. अश्या सर्व प्रकारावर कारवाई करावी आणि सर्व प्रकार थांबवावेत अन्यथा आप रस्त्यावर उतरून आंदोलन करणार.

*शगाजावाजा करून  एक हजार कोटी रु खर्च स्मार्ट सिटी बनवली पण त्यामध्ये मूलभूत सुविधा सुद्धा सुरळीत करतात आल्या नाहीत. सरकार ला फक्त नागरिकांकडून टॅक्स वसूल करायचा आहे, सुविधा मात्र द्यायच्या नाहीत. नागरिकांच्या सहनशक्ती चा अंत पाहू नका, अनेक प्रकारे आर्थिक, मानसिक नुकसान होत आहे. याला जबाबदार वीज पुरवठा अधिकारी आहेत. – श्री सुदर्शन जगदाळे, पुणे शहराध्यक्ष

श्री पंडित दांडगे, अतिरिक्त अभियंता यांना फोन वर बोलून कारवाई ची मागणी केली. या वेळी आप चे रितेश निकाळजे आणि सुदर्शन जगदाळे यांनी कार्यालयात निवेदन दिले.

See also  आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या महिला कुस्तीगीरांना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सर्व साधारण सभेचा पाठिंबा