केंद्रीय मंत्रिमंडळाने 7,827 कोटी रुपये किंमतीच्या व 30किमी लांबीच्या, 8-लेन एलिव्हेटेड नाशिक फाटा-खेड कॉरिडॉरला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 7,827 कोटी रुपये किंमतीच्या व 30किमी लांबीच्या, 8-लेन एलिव्हेटेड नाशिक फाटा-खेड कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे. हा कॉरिडॉर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि चाकण यांसारख्या प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडेल, ज्यामुळे या भागाची लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.

हा कॉरिडॉर मेगा फूड पार्क, टेक्सटाईल क्लस्टर्स, SEZ, फार्मा आणि मेडिकल क्लस्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्रासह 10 आर्थिक नोड्सना कनेक्टिव्हिटी प्रदान करेल, ज्यामध्ये नऊ जंक्शन्स आणि सुलभ वाहतूकीसाठी दोन मोठे पूल समाविष्ट आहेत.

मुरलीधर मोहोळ, केंद्रीय मंत्री
या प्रकल्पामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच चाकण परिसराच्या विकासातील एक मोठा अडथळा दूर होईल. यामुळे या भागातील ऑटोमोबाईल क्षेत्र तसेच इतर उद्योगांसाठी लॉजिस्टिक्स क्षमता वाढेल, वाहतूक खर्च कमी होईल तसेच ट्रॅफिक जाम आणि प्रदूषणाची समस्या दूर करण्यास मदत होईल. या कॉरिडॉरला मंजुरी दिल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन

See also  एप्रिल महिन्यात १५ दिवस बँकांना असतील सुट्या.