स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीसाठी गोळाबेरीज सुरु

पुणे : स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीसाठी गोळाबेरीज सुरु असल्याची चर्चा जोर धरत आहे.

स्वराज्य च्या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू डॉ. राजरत्न आंबेडकर यांची उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमानंतर एका कार्यकर्त्यांच्या घरी रानमेवा भाज्यांच्या जेवणाचा एकत्र आस्वाद घेत आगामी निवडणुकांबाबत सकारात्मक चर्चा

पुण्यात मागील कार्यक्रमासाठी प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांची उपस्थिती होती. तर आज बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू डॉ. राजरत्न आंबेडकर यामुळे संभाजीराजेंनी पुढाकार घेतल्याचे दिसुन येत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तिसऱ्या आघाडीचा पर्याय समोर येऊ शकतो अशी चिन्हे या निमित्ताने निर्माण झाले आहेत.

See also  खडकवासला मतदारसंघात सुमारे ५६.५३% मतदान; लोकशाहीसाठी उत्स्फूर्त सहभाग