बाणेर : विद्यांचल हायस्कूलच्या प्रांगणात ७८ वा स्वातंत्रदिन इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी एकत्रीतपणे साजरा केला. यावेळी प्रमुख पाहुणे सिपाही दीपक बर्मन , योगीराज नागरी पतसंस्थेचे संस्थापक श्री ज्ञानेश्वर तापकीर, रोटरी क्लब चे सदस्य राजेंद्र शेलार, सुखानंद जोशी, ए. सी. एम. ए. चे समुपदेशक सचिन मोरालवार, इंडियन आर्मी मध्ये कार्यरत असलेले मेजर. आकाश पवार तसेच अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन मा. अशोक मुरकुटे सर, संस्थेचे माननीय सदस्य श्री भालचंद्र मुरकुटे ,सौ.श्वेता मुरकुटे ,सौ.योगिता बहिरट , इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ.मनीषा कुलकर्णी व मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली महाजन, सौ संगीता डेरे व सौ सुनंदा धोत्रे तसेच उपमुख्याध्यापिका व सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होता.
पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ध्वजगीत सादर करून , देशप्रेम व्यक्त करणाऱ्या घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या, ‘कारगील विजय दिवस व कारगिल युद्धातील जवानांची शौर्यगाथा’, यावर आधारित भाषणे व समूहगीत,विद्यार्थ्यांकडून सादर केले गेले. अशा विविध कार्यक्रमांचे अतिशय उत्साहात व जल्लोषात सादरीकरण झाले.
उपस्थित पाहुण्यांच्या भाषणातून विद्यार्थ्याना मोलाचे मार्गदर्शन लाभले व त्यांची शौर्यगाथा विद्यार्थ्यांना समजली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्वेता रणदिवे यांनी केले.