राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाषाण नगराचे दिवाळी स्नेहमिलन

पाषाण : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाषाण नगराचे दिवाळी स्नेहमिलन व दिवाळी फराळ संपन्न झाले. यावेळी पाषाण सुतारवाडी सोमेश्वरवाडी परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविका ने कार्यक्रमाची सुरुवात झाली सर्वांचा परिचय झाला आलेल्या मान्यवरांनी ते करत असलेल्या कामांची थोडक्यात माहिती सांगितली.
संघ सेवाकार्य व आजच्या परिस्थितीत आपण आपल्या कुटुंबापासून काही छोट्या छोट्या गोष्टी करून समाज परिवर्तन करू शकतो असे काही उपक्रम सांगितले तसेच आगामी श्रीराम जन्मभूमी संपर्क अभियान व प्राणप्रतिष्ठापणा व या कार्यक्रमा मध्ये आपण कसे सहभागी होऊ शकतो याची माहिती सांगितली.
यावेळी मजी संघचालक राजाभाऊ सुतार, संजय एडके,
सारंग वाबळे, प्रशांत वाडेकर, राहुल कोकाटे, गोविंद रणपिसे, सचिन पाषाणकर, सचिन दळवी, हभप दहिभाते महाराज, संतसेवक मारूती कोकाटे, नितीन कोकाटे, शैलेश निम्हण, संजय निम्हण, मयूर सुतार, महेश सुतार, मधूकर दळवी, योगेश तुपे, जाधव, दिलीप रणपिसे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात अनौपचारिक गप्पा झाल्या व सर्वांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

See also  बाणेर येथील सायकर मळा भागातील ड्रेनेज दुरुस्ती बाबत मनसेचे निवेदन