पाषाण : पाषाण परिसरातील समस्या ला वाचा फोडण्या साठी शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पाषाण. सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, बाणेर, बालेवाडी यांच्या वतीने स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. पाषाण सुस रोड पुला जवळ बाणेर कडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. हा रस्ता खुला करण्यात यावा व या ठिकाणी सिग्नल व्यवस्था बसवण्यात यावी अशी मागणी साठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
यावेळी सुस रस्ता परिसरातील नागरिकांनी भरघोस पाठिंबा दिला आणि अनेक समस्या मांडल्या यावेळी पुणे महानगरपालिकेचे माजी शिवसेना गट नेते माजी नगरसेवक मा श्री पृथ्वीराज शशिकांत सुतार, समन्वयक श्री संजय निम्हण, श्री अजय निम्हण, श्री अशोक दळवी, विभाग प्रमुख श्री संतोष तोंडे ,श्री महेश सुतार. युवा सेना उप आधीकरी विधानसभा श्री अमित रणपिसे.श्री ऋषिकेश कुलकर्णी. श्री दिनेश नाथ. श्री अजिंक्य सुतार. शाखाप्रमुख श्री अमोल फाले. श्री गणेश दळवी.श्री राजू कांबळे. शाखाप्रमुख श्री निखिल निम्हण. श्री विकी निम्हण. श्री ओंकार निम्हण.श्री वैभव दळवी. श्री कैलास निम्हण. श्री मंगेश सुतार. विकास निम्हण.श्री संजय किंडरे.उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अजय निम्हण यांच्या माध्यमातून सुसरोड, पाषाण मधील विविध प्रश्न सोडवण्या साठी पुढाकार घेतला जात आहे. सुसरोड परिसरातील नागरिकांना महामार्गावर व बाणेर कडे जाण्यासाठी सुईस गावाच्या दिशेने जाऊन यूटर्न मारावा लागतो. यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असून वाहने वळवण्याच्या ठिकाणी देखील वाहतूक कोंडी व अपघात होतात.
महामार्ग व बाणेर कडे जाण्यासाठी दुभाजक काढून या ठिकाणी सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.