पुणे व पिंपरी चिंचवडमधील इंग्लिश मीडियम स्कुलच्या संस्थाचालकांची गुरव पिंपळे येथे महत्त्वाची बैठक

पिंपरी : आमदार जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत पुणे व पिंपरी चिंचवडमधील इंग्लिश मीडियम स्कुलच्या संस्थाचालकांसोबत गुरव पिंपळे येथे महत्त्वाची बैठक झाली.

या बैठकीत संस्थाचालकांना शासकीय कामकाजात येणाऱ्या अडीअडचणींवर चर्चा झाली. यामध्ये आरटीई नियम संदर्भातील समस्या, नवीन शाळा मान्यतेचे निकष, जिल्हा परिषद कार्यालयात येणाऱ्या अडचणी यावर सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीत अनेक संस्था चालकांचे वैयक्तिक प्रश्न आमदार जयंत आसगावकर यांनी मार्गी लावले.

या बैठकीला शरदचंद्र धारूरकर, जागृती धर्माधिकारी, अशोक मुरकुटे, किशोर माने, सिमरंजीतसिंग चावला, सोनिया बेलगावकर, शिवाजी बुचडे, चंद्रशेखर सर, संदीप काटे, रेड्डी सर, प्रदीप रॉय, राजेंद्र भोसले, प्रभा सहा यांच्यासह संस्थाचालक उपस्थित होते.

See also  बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर जरब बसवा!बाणेर-बालेवाडी भागात चौक्या वाढविण्यासाठी सर्वतोपरी मदत करु - आमदार चंद्रकांतदादा पाटील