पाषाण : सुतारवाडी शिवशक्ती चौक कपिल आसमान सोसायटी समोरील कचरा वर्गीकरण प्रकल्पा शेजारी रस्ता मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी व गाळ साचला आहे. यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
पावसाचे पाणी साठत असल्याने या पाण्यात डासांचे प्रमाण देखील वाढत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. कचरा वर्गीकरण रस्त्यावर करण्यात येत असल्यामुळे या परिसरात दुर्गंधी निर्माण होत असून परिसर स्वच्छ करण्याचे मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
रस्त्यावर साठलेला गाळ काढण्यात यावा तसेच परिसर स्वच्छ करण्यात यावा व रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे यावे अशी मागणी केली जात आहे.