गड किल्ल्याच्या आर्किटेक्चरल दस्तऐवजीकरण स्पर्धेत  सहभाग घ्यावा-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि.१५: राज्यातील गड किल्ले जागतिक वारसा स्थळ नामांकन जनजागृती मोहिमेत नागरिकांना सहभागी करुन घेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून याचाच भाग म्हणून गड किल्ल्याच्या आर्किटेक्चरल दस्तऐवजीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे; महाविद्यालय, गिरीप्रेमी व  वास्तुविशारद संस्थेनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

या स्पर्धेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रथम ५ गटांना प्रत्येकी २५ हजार रुपये, गिरीप्रेमी, वास्तुविशारद संस्था, आर्किटेक्ट व सामान्य नागरिकांच्या वर्गवारीच्या प्रथम ५ गटांना २५ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उपसंचालक, पर्यटन संचालनालय, पुणे व सहायक संचालक, पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नोंदणी करावी. दस्तऐवजीकरण तसेच इतर बाबींकरिता जिल्ह्यातील महाविद्यालयानी सहभाग घ्यावा, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले आहे.

स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी, सहायक संचालक, पुरातत्व विभाग, पुणे यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष अथवा adapune77@gmail.com वर सहभाग नोंदवावा, असे आवाहन पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे यांनी केले आहे.

See also  नौसेना दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत बिटिंग रिट्रीट समारोह संपन्न