युवासेना प्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांची गणेशोत्सवा मध्ये श्रीशिवसाम्राज्य प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळास भेट

कोथरूड : युवासेना प्रमुख, शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री, आमदार मशआदित्य ठाकरे यांनी कोथरूड येथील श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान ( ट्रस्ट ) गणेशोत्सव मंडळास भेट देवून, श्री गणरायाची आरती केली व दर्शन घेतले.

त्यांच्यासोबत शिवसेना पुणे संपर्क प्रमुख, उपनेते,आमदार  सचिनभाऊ अहिर, उपनेत्या सुषमा अंधारे, शहरप्रमुख गजानन थरकुडे, पृथ्वीराज सुतार, संजय मोरे, युवा सेनेचे राम थरकुडे, वसंत मोरे उपस्थित होते. मंडळाच्या वतीने संस्थापक, शिवसेना उपनेते, माजी मंत्री शशिकांत सुतार यांनी स्वागत केले. महिला मंडळाच्यावतीने आदित्य ठाकरे यांचे औक्षण करण्यात आले. एकदंत ढोल पथकांतील वादकांसोबत मा.आदित्य ठाकरे यांनी ढोल वादनाचा आनंद घेतला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक व नागरिक बंधु – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  मुळशी साठी पुर्ण वेळ गटविकास अधिकारी मिळावा म्हणून स्वराज्य पक्षाचे बोंबा मारो आंदोलन