श्री सर्वपल्ली राधाकृष्णन मनपा बोपोडी शाळेच्या आवारात दारूच्या बॉटल्यांचा खच; पालिका शाळांच्या सुरक्षेतेबाबत गंभीर नाही

पुणे : श्री सर्वपल्ली राधाकृष्णन मनपा बोपोडी शाळेच्या आवारात दारूच्या बॉटल्यांचा खच, चकणा पाकीट, डोक्या इतके गवत. भिंतीवर 20-20 फूट झाडे, भले मोठे मैदान आहे पण फक्त साफ सफाई मुळे निरुपयोगी. शाळेची सुरक्षा रक्षक व्यवस्था, स्वच्छ्ता धाब्यावर ही परिस्थिती आम आदमी पार्टीच्या वतीने महानगरपालिकेच्या झोपलेल्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत स्वच्छता करण्यात आलीआहे. मनपाच्या श्री सर्वपल्ली राधाकृष्णन शाळेच्या आवारात एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आढळून आल्याने मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.

आम आदमी पार्टीच्या वतीने पाहणी केले असता शाळेत धक्कादायक परिस्तिथी समोर आली आहे. शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, स्वच्छ्ता होत नाही, टॉयलेट मध्ये पाणी नाही, मच्छर ची फवारणी नाही, सुरक्षा रक्षक अपुरे, रात्री मद्यापी शाळेत बसून दारू पितात अशी स्थिती समोर आली.शाळेतील मुख्याध्यापकांनी अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही पालिका प्रशासनाकडून दाद मिळत नाही.

पुणे महापालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतू शकते मनपा प्रशासन फक्त नागरिकांकडून टॅक्स वसूल करते पण मूलभूत सुरक्षा आणि शाळा सुद्धा उपलब्ध करून देत नसल्याची बाब समोर आली आहे.

जोपर्यंत वरील प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम आदमी पार्टी चे सर्व कार्यकर्ते हे शाळेत येऊन काम करून घेणार आहेत. यावेळी पुणे शहराध्यक्ष  सुदर्शन जगदाळे, महिला उपाध्यक्ष अँन अनिश, संघटन सह मंत्री श्री विकास चव्हाण, श्री रितेश निकाळजे यांनी शाळेमध्ये स्वच्छता काम सुरू करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
श्री मुकुंद किर्दत, प्रवक्ते, श्री सतीश यादव, महासचिव, श्री विकास लोंढे, प्रभाग अध्यक्ष यांनीही येऊन प्रशासनाकडून काम करून घेतले.

राज्य शाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असताना पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मात्र सुरक्षेबाबत गांभीर्य पाळले जात नाही या पार्श्वभूमीवर शासन आणि शिक्षण प्रमुखांचे तातडीने बदली करून शाळांच्या सुरक्षिततेबाबत शासन गंभीर असल्याचे दाखवून द्यावे. पुणे महानगरपालिकेच्या शाळांची आम आदमी पार्टीच्या वतीने पाहणे करून शाळांच्या समस्या सोडवण्यासाठी आम आदमी पार्टी लक्ष घालेल असे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांना सांगितले.

See also  टेकड्यांवर वनराई नष्ट करणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कारवाई करा - नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वन विभागाला निर्देश