दुर्बल घटकांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा व जनसेवा – अरविंद शिंदे, अध्यक्ष- पुणे शहर काँग्रेस

पुणे : दुर्बल घटकांची सेवा हीच खऱ्या अर्थाने जनसेवा होय व तीच खरी ईश्वर सेवा होय असे उद्गार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री अरविंद शिंदे यांनी काढले निमित्त होते पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या पेन्शन पुस्तिका व मंजुरी पत्रांचे वाटप श्री अरविंद शिंदे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून प्रभाग क्रमांक २० च्या अनुसूचित जाती विभागाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी सदर कार्यक्रमात श्री शिंदे बोलत होते, ताडीवाला रोड प्रायव्हेट रोड व आसपासच्या परिसरातील अंध, अपंग,विधवा, निराधार,परि तक्त्या,दुर्धर आजाराने युक्त,व ज्येष्ठ नागरिक महिला बंधू भगिनींना श्री शिंदे व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये जवळपास ४० लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचे मंजुरी पुस्तक व व मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय आवर ताडीवाला रोड या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाप्रसंगी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित विभागाचे अध्यक्ष सुजित आप्पा यादव, प्रदेश काँग्रेसचे सदस्य श्री महबूब भाई नदाफ, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष श्री विठ्ठलराव गायकवाड, पुणे शहर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष हंगर्गी, प्रभाग क्रमांक २० काँग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष श्याम गायकवाड, भवानी ब्लॉकचे उपाध्यक्ष ॲन्थोनी वाकडे, सोनू काळे, मुन्ना खंडेलवाल, युनूस शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
     सदर कार्यक्रमाचे आयोजन अनुसूचित विभागाचे शहर पदाधिकारी संदीप कांबळे करण कांबळे अभिषेक यादव रणवीर कांबळे बाबू भंडारी गणेश तूपदार दयानंद तानावडे ईश्वर गायकवाड महेश वाघमारे इत्यादींनी केले होते.

See also  राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर बच्चू कडू चर्चेत का आले