राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीरनामा समिती वळसे पाटील अध्यक्ष

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करण्यासाठी उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

या समितीमध्ये धनंजय मुंडे, अनिल भाईदास पाटील, नरहरी झिरवाळ, आदिती तटकरे, समीर भुजबळ , इद्रिस नायकवडी, अविनाश आदिक, रुपाली चाकणकर, वैशाली नागवडे, रुपाली ठोंबरे-पाटील, सूरज चव्हाण, नजीब मुल्ला, कल्याण आखाडे, सुनील मगरे, संजय मिस्कीन आणि आनंद परांजपे यांचा समावेश आहे. आमदार शिवाजीराव गर्जे समितीचे निमंत्रक आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी समितीतील नावांची घोषणा शनिवारी केली.

See also  शिवाजीनगर भागातील होमी भाभा इस्पितळ तातडीने सुरू करण्याची आप ची मागणी. दिरंगाईला महापालिका विभागाचा बेजबाबदारपणा कारणीभूत!