बाणेर येथील योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दिला जाणारा योगीराज भूषण पुरस्कार व जीवनगौरव पुरस्कार सोहळा रविवारी संपन्न होणार

बाणेर : योगीराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बाणेर यांच्या वतीने देण्यात येणारा ‘योगीराज भूषण पुरस्कार’ व जीवनगौरव पुरस्कार तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता माऊली गार्डन मंगल कार्यालय बाणेर येथे संपन्न होणार आहे.


या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, खासदार मेधा कुलकर्णी या मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक, सांप्रदायिक, क्रीडा, आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

यावर्षीचा योगीराज भूषण पुरस्कार उद्योग क्षेत्रामध्ये विशेष योगदान दिलेले यशस्वी उद्योजक विजयराव बोत्रे यांना तर योगीराज जीवन गौरव पुरस्कार हॉटेल क्षेत्रामध्ये विशेष योगदान दिलेले बाणेर गावचे रामदास मुरकुटे (संस्थापक स्वरा ग्रुप ऑफ हॉटेल्स) यांना प्रदान केला जाणार आहे. तसेच योगीराज विशेष गौरव पुरस्काराने भारतीय नेमबाज ऑलम्पिक कास्य पदक मिळविल्याबद्दल स्वप्निल कुसाळे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त  तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळविल्याबद्दल स्नेहल शिंदे (साखरे), फिन्द्री कादंबरीच्या सुप्रसिद्ध लेखिका प्राध्यापिका डॉ. सुनिता बोर्डे आणि नऊवारी साडी घालून चाळीस देशांचा बुलेटवर प्रवास केल्याबद्दल भारत की बेटी रमिला उर्फ रमाबाई लटपटे यांना गौरविण्यात येणार आहे.

योगीराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान केले आहे.

See also  डॉ.तुषार पोपटलाल चौधरी यांचे निधन