पाषाण सुतारवाडी भागातील नागरिक समस्यांची भाजपाचे राहुल कोकाटे यांच्यासोबत मनपा अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी

पाषाण  : भाजपाचे शहर चिटणीस राहुल कोकाटे यांनी पाषाण-सुतारवाडी भगातील विविध नागरी-समस्यांबाबत मनपा अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पहाणीकरुन त्या सोडवण्याबाबत सुचना केल्या.


सुतारवाडी स्मशानभूमी मधील ड्रेनेज व पावसाळी लाईन नव्याने करणे,सुतारवाडी-सुस रोड-पाषाण, सोमेश्वरवाडी भागातील पाणीपुरवठा सुरळीत करणे,लेक व्हिव व सिद्धटेक सोसायटीतील ड्रेनेज दुरुस्ती याबाबत पाहणी करून या समस्या सोडवण्याची मागणी यावेळी केली.


यावेळी पाणी पुरवठा विभागाचे श्री येनकर साहेब,L&T सामान पाणी पुरवठा योजनेचे श्री व्यंकटराव,श्री प्रतीक
ड्रेनेज विभागाचे श्री यलभर साहेब उपस्थित होते
भाजप पुणे शहर सचिव श्री राहुल कोकाटे,भाजप कार्यकर्ते श्री अमोल पाटिल यांचा मार्फत नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या.

See also  पोलीस दलाच्या अद्यावतीकरणासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करू- पालकमंत्री चंद्रकांत पाटील