कोथरूड -अखिल मौर्य विहार गणेश मंडळाचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. अखंड २५ वर्षे मंडळाने जनजागृती, समाजोपयोगी आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर अधिक भर दिलेला आहे. मंडळाच्या वतीने यंदा भव्य असा श्री गणेश आगमन सोहळा अत्यंत भक्ती भावाने आणि उत्साहात संपन्न झाला.
पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात,झांजांच्या निनादात,ध्वज नाचवत गणरायाचे स्वागत करण्यात आले. मिरवणुकीचे जागोजागी माता-भगिनींनी स्वागत केले.गणरायाच्या आगमनानंतर मंडळामध्ये प्राणप्रतिष्ठापना विधी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने पार पडला.याप्रसंगी सर्व सदस्य माता-भगिनी उपस्थित होत्या. गणपती बाप्पाच्या आगमनाने भक्ती, एकोप्याची भावना आणि सामाजिक ऐक्याची भावना दिसून आली.सर्व वयोगटातील भक्तांचा उत्साह, महिलांचा सहभाग,तरुणाईची निष्ठा आणि लहान मुलांचा निरागस आनंद यामुळे सोहळ्याचे सौंदर्य अधिकच खुलले. यंदा मंडळाकडून भव्य आणि आकर्षक “फुलांचा महल” साकारण्यात आला आहे. रांगोळी, निबंध,वकृत्व,चित्रकला,चमचा लिंबू, संगीत खुर्ची अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गणेशोत्सव काळात सोसायटीतील महिलांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. मंडळाच्या रौप्यमहोत्सवाचे औचित्य साधून “सूर निरगस हो”हा मराठी/हिंदी गाण्यांचा सुरेल कार्यक्रम होणार आहे.मंडळ विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमही राबवत असते यात प्रामुख्याने कोजागिरी पौर्णिमा, दहीहंडी उत्सव, दिवाळी पहाट अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. मंडळाच्या वतीने वर्गणीसाठी कधीही आग्रह अथवा जबरदस्ती केली जात नाही हे मंडळाचे वैशिष्ट्य आहे. शहरात गणेशोत्सवाला एक वेगळेपणा देण्याचा प्रयत्न मंडळ दरवर्षी करत असते. मंडळाचे अध्यक्ष सौरभ बनपट्टे असून उपाध्यक्ष तेजस बोत्रे,वरद संत खजिनदार अविनाश क्षीरसागर आकाश वाणी तसेच मंडळाचे आधारस्तंभ गितेश भिलारे, महेश शिंदे,तेजस घोडके, विलास इंगवले हे आहेत.
या वर्षीची गणेश विसर्जन मिरवणूक अत्यंत शांततेने व नियोजनबद्ध करण्याचा मानस असल्याचे सभासद प्रदिप गावडे यांनी सांगितले.