मुंबई : महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्री व आमदार ह्यांना तात्काळ बडतर्फे करण्यात यावे ह्या मागणीसाठी शिवसेना नेते माजी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ह्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन ह्यांची भेट घेतली.
ह्यावेळी शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, उपनेत्या सुषमा अंधारे, उपनेते विजय कदम, शिवसेना सचिव ॲड. साईनाथ दुर्गे, सचिव सुप्रदा फातर्पेकर, सचिव पराग डाके, आमदार ज. मो. अभ्यंकर, उपनेते आमदार मनोज जामसुतकर, उपनेते भाऊ कोरगावकर, उपनेते विठ्ठलराव गायकवाड, उपनेते नितीन नांदगावकर, उपनेते अशोक धात्रक, उपनेते आमदार नितीन देशमुख, उपनेते बबन थोरात, आमदार विभागप्रमुख महेश सावंत, आमदार बाळा नर आणि आमदार हारुन खान उपस्थित होते.