फुरसुंगी,उरुळी देवाची गावे पुणे महानगरपालिकेतून वगळणार : अशी असणार म्हणून पुणे महानगरपालिकेची नवी हद्द

मुंबई : फूरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावं पुणे महापालिकेतून वगळ्यात यावीत अशी मागणी बऱ्याच काळापासून होत होती. ती मागणी आता पुर्णत्वास आली असून ही दोन्ही गावं महापालिकेतून वगळण्यात आली असून त्यांची नगर परिषद होणार आहे.
त्याबाबतचे आदेश राज्य शासनाचे उप सचिव अनिरूध्द व्यं. जेवळीकर यांनी आज काढले आहेत. फुरसुंगी आणि उरूळी देवाची या गावांची स्वतंत्र नगरपालिका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फुरसुंगी आणि उरूळी देवाची गावे पालिकेतून वगळावीत व त्यांची स्वतंत्र नगरपालिका करावी, अशी मागणी काही ग्रामस्थांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडे केली. माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मान्यता दिली.

पुणे महानगरपालिका हद्दीतून वगळावयाचे क्षेत्र –

फुरसुंगी – स.नं. 193, 192 पै, 194, 195 पै, (कचरा डेपो) चे क्षेत्र वगळून गावठाणासह संपुर्णमहसुली गावाचे क्षेत्र

उरूळी देवाची – स.नं. 30,31 व 32 पै, (कचरा डेपो) चे क्षेत्र वगळून गावठाणासह संपुर्ण महसुली गावाचे क्षेत्र

पुणे महानगरपालिकेची सुधारित हद्द (Pune PMC News)

उत्तर – कळस, धानोरी व लोहगाव या महसुल गांवाची हद्द

उत्तर पुर्व – लोहगाव, वाघोली या महसुल गावांची हद्द

पूर्व – मांजरी बु., शेवाळेवाडी, हडपसर या महसूली गावांची हद्द व फुरसुंगी महसुली गावातील कचरा डोपोची हद्द

दक्षिण पुर्व – महंमदवाडी, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी या महसूली गावांची हद्द व उरूळी देवाची महसुली गावातील कचरा डेपोची हद्द

दक्षिण – धायरी, वडाचीवाडी, येवलेवाडी, कोळेवाडी, भिलारेवाडी या महसूली गावांची हद्द

दक्षिण-पश्चिम – पश्चिमेस नांदेड, खडकवासला, नांदोशी सणसनगर, कोपरे या महसूली गावांची हद्द

पश्चिम – कोंढवे धाडवे, बावधन बु. व खुर्द, म्हाळुंगे, सुस या महसुली गावांची हद्द

पश्चिम-उत्तर – बाणेर, बालेवाडी या महसूली गावांची हद्द व पुणे महानगरपालिकेची जुनी हद्द

See also  येरवडा कारागृहात अभिविक्षक मंडळाची त्रैमासिक बैठक संपन्न