पुणे जिल्हा बिलीयडर्स आणि स्नुकर संघटनेच्या स्थापनेची अधिकृत घोषणा !!

पुणे, १ ऑक्टोबरः गेल्या अनेक वर्षांपासुन पुणे जिल्ह्यामध्ये खेळल्या जाणार्‍या क्यु स्पोर्टस् क्रिडा क्षेत्रामध्ये विकास, प्रसार आणि सुधारणा करण्याच्या मुख्य उद्देशाने पुणे जिल्हा बिलीयडर्स आणि स्नुकर संघटना (पीडीबीएसए) स्थापना करण्यात आली असून पुण्यामध्ये आज रोजी त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. स्पर्धात्मक संधी आणि दर्जेदार प्रशिक्षणाव्दारे पुणे जिल्ह्यातील क्यु स्पोटर्सचा दर्जा लक्षणीयरित्या उंचविण्याचे उद्दीष्ट्य आणि विश्वास पीडीबीएसएने व्यक्त केला आहे.

या संदर्भातील पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती देताना पीडीबीएसएचे अध्यक्ष एडमंड सँचेस म्हणाले की, पुणे शहर आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्नुकर आणि बिलीयडर्स या क्यु क्रिडाप्रकाराचा प्रसार, प्रचार आणि लोकप्रियता फार झपाट्याने वाढत आहे. पुण्यामध्ये क्यु स्पोटर्सला इतिहास असून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू या खेळाने दिले आहेत. पुण्यामध्ये अनेक नामांकित क्लब आणि स्पोटर्स सेंटर आहेत, ज्यामध्ये क्यु स्पोटर्सचा समावेश आवर्जुन होतो.

पीडीबीएसएच्या स्थापनेमागची उद्दीष्ट्य सांगताना बीएसएएमचे राजन खिंवसरा आणि पीडीबीएसएचे समर खंडेलवाल म्हणाले की, युवा आणि गुणवान खेळाडूंच्या प्रतिभेचा विकास व्हावा तसेच बिलीयडर्स आणि स्नुकर खेळाचा दर्जा वाढवण्याच्या वचनबध्दतेसह या संघटनेची निर्मिती करण्यात आली आहे. या संघटनेच्या मार्फत खेळाडूंना स्पर्धात्मक खेळाची संधी मिळावी तसेच स्थानिक क्यु स्पोटर्स क्षेत्रामध्ये एक नवी क्रांती, बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेत यशस्वी होणार्‍या आणि पुण्यातील भावी पिढ्यांना आपल्या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा देणार्‍या खेळाडूंचा समुदाय तयार करणे, हे आमचे मुख्य ध्येय आहे.

या संघटनेच्या भविष्यातील योजनांविषयी सांगताना राजन खिंवसरा आणि समर खंडेलवाल म्हणाले की, पुण्यामधील सर्वच स्तरावरच्या खेळाडूंना स्पर्धात्मक व्यासपीठ मिळावे या उद्दीष्ट्याने दरवर्षी कमीतकमी १५ विविध स्पर्धांचे आयोजन करण्याचा आमचा मानस आहे. अशा स्पर्धांव्दारे उदयोन्मुख खेळाडूंना संधी मिळले तसेच सामुदायिक किंवा सांघिक सहभाग वाढण्याससुद्धा प्रोत्साहन मिळणार आहे. अशा स्पर्धांमुळे खेळाडू घडताना सकारात्मक भावना वाढण्याससुद्धा मदत मिळणार आहे.

संघटनेची भुमिका केवळ स्पर्धात्मक नसून खेळाडूंना विशिष्ट प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित करून भविष्यातील चॅम्पियन्स् निर्माण करून घडविण्याचेही उद्दीष्ट्य आहे. गुणवान खेळाडूंना तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देणे, तसेच कौशल्यविकास आणि क्यु क्रिडाप्रकारातील प्रगत ज्ञान मिळवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नवीन शिकणार्‍या ते प्रगत राष्ट्रीय खेळाडूंपर्यंत अशा सर्व बिलीयडर्स आणि स्नुकर प्रेमींना पीडीबीएसए या रोमांचक उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत असून पुण्यात एकत्रितपणे आपण क्यु क्रीडा संस्कृती निर्माण करण्याच्या कार्यात सहभागी व्हावे, अशी आमची ईच्छा आहे.

पीडीबीएसए कार्यकारीणी समितीः कार्यकाळ २०२४-२५ ते २०२७-२८:
अध्यक्षः एडमंड सँचेस,
उपाध्यक्षः चिंतापणी जाधव, अ‍ॅलेक्स रेगो;
सहसचिवः ऋषी रामय्या, सिद्धांत फाटे;
सहखजिनदारः अरूण बर्वे, बर्नाड रेगो;
कार्यकारीणी सदस्यः समर खंडेलवाल, रोहन साकळकर, अभिजीत रानडे, निमीष कुलकर्णी, झुबिन रजिस्ट्रार, क्रेझॉल डिसिल्वा, बलराज सिंग, तन्मय जातकर.

See also  राज्यात चौथ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान