जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आयोजित आधार, पॅन आणि मतदान कार्ड शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; दर आठवड्याला राबवला जातो सोसायटीमध्ये उपक्रम

बाणेर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष,  जयेश मुरकुटे यांच्या संकल्पनेतून जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या वतीने गेल्या अनेक आठवडे बाणेर बालेवाडी परिसरातील विविध सोसायटीमध्ये दर शनिवारी आणि रविवारी मोफत आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान कार्ड शिबिर राबवण्यात येत आहे.


यामध्ये नवीन आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान कार्ड काढणे व दुरुस्ती यासंबंधीची कामे करणे नागरिकांना सहजपणे आपल्या घरापाशी उपलब्ध होत असल्यामुळे बाणेर आणि बालेवाडी परिसरातील नागरिकांनी या शिबिरास भरभरून प्रतिसाद दिला आहे.विविध सोसायटी तर्फे जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन कडे या शिबिराची मागणी होत आहे. उपक्रमाबद्दल जयेश मुरकुटे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

See also  जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावा