बाणेर : तेजस्विनी सहकारी गृहरचना संस्था बाणेर सर्वे नंबर 242 औंध बाणेर डीपीरस्ता येथे उपनिबंधक सहकारी संस्था निलम पिंपळे यांच्या आदेशानुसार प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली.
तेजस्विनी सहकारी गृहरचना संस्थेमध्ये अनियमित कारभारामुळे गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी संस्थेचे सदस्य प्रवीण नवले यांनी उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर यांच्याकडे केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेऊन प्रवीण नवले यांना आवश्यक असलेली माहिती उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच संस्थेतील आर्थिक व्यवहार व निवडणुका याबाबत देखील तक्रारी असल्याने याचे निवारण करण्यासाठी उपनिबंधक सहकारी संस्था यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 154 (27) (2) अन्वयआदेश दिले आहेत.
राज्य माहिती आयोग खंडपीठ पुणे यांनी सहकारी अधिकारी श्रेणी 1, उपनिबंध सहकारी संस्था पुणे शहर 2, दिलेल्या आदेशानुसार प्रशासक नियुक्त करून माहिती उपलब्ध करून देण्याचे आदेश उपनिबंध सहकारी संस्था यांनी दिले आहेत.