पिंपरी चिंचवड शहरातील चिखली गावातील अरुंद रस्त्यांमुळे होणाऱ्या ट्रॅफिक च्या समस्येविरोधात  महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे आंदोलन

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील चिखली गावातील अरुंद रस्त्यांमुळे निर्माण झालेल्या ट्रॅफिक च्या समस्येविरोधात  महाराष्ट्र स्वराज्य पक्ष पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष विजय जरे यांच्या नेतृत्वात व महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे राज्य सरचिटणीस,प्रवक्ते धनंजय भाऊ जाधव यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली जनआंदोलन उभारण्यात आले होते.


स्वराज्य पक्षाचे शहराध्यक्ष विजय जरे यांनी सांगितले कि, साने चौक ते चिखली गाव हा रस्ता मंजुर असताना देखील आजपर्यंत पालिका प्रशासन तसेच खासदार,आमदार तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून कोणतेच प्रयत्न होत नाहीत.
चिखली भाग हा बऱ्यापैकी औद्योगिक भागाशी जोडला गेलेला असल्याने मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग या भागात राहण्यासाठी आहेत.उंच इमारती त्यामधील निर्माण होणाऱ्या सदनिका यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढते आहे परंतु गेल्या दहा वर्षात एकही डीपी रस्ता चिखली भागातील विकसित झालेला नाही.मंजूर रस्ता हा 28 मीटर चा आहे परंतु प्रत्यक्षात पहिले रस्ता दिसताना 40 फूट दिसतो आणि मोजला तर 20 फूटच भरेल अशी अवस्था आहे.
यामुळे कामगार कामावर वेळेत पोहचत नाही तसेच विद्यार्थी शाळेत वेळेवर पोहचू शकत नाहीत तसेच घरी जाताना पण हेच हाल सर्व घटकातील नागरिकांचे आहेत.त्यामुळे नाईलाजाने प्रशासनाविरोधात आम्हाला हे आंदोलन उभारावे लागले असे विजय जरे यांनी सांगितले.


या आंदोलन प्रसंगी स्वराज्य पक्षाच्या आंदोलनाची दखल घेत पालिका अधिकारी यांनी घेतली व स्वतः आंदोलन ठिकाणी उपस्थित राहत लवकरात लवकर समस्येवर तोडगा काढून रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सूरूवात करू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

याप्रसंगी नागरिकांनी सुद्धा प्रशासन तसेच स्थानिक नेतृत्वाच्या रोड रुंदीकरणाच्या अनस्थेबद्दल तीव्र संताप व्यक्त करत आंदोलनाला पाठिंबा दिला.या आंदोलनाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट तसेच शिव वाहतूक सेना,शिवसेना यांनी पाठिंबा दर्शवला.
या आंदोलन प्रसंगी स्वराज्य पक्षाचे राज्यकार्यकारिणी विनोद परांडे,मुळशी तालुका अध्यक्ष राजु फाले,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर,जीवन बोराडे, आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष ब्रम्हानंद जाधव ,पिंपरी चिंचवड शहर निमंत्रक निकेत कासार,शुभम वाळके,सचिन शिंदे,किशोर तेलंग,रमेश सांगाडे,बाबू खवळे,विक्की गजरमल,हर्षल वाडेकर,द्वारकेश जाधव,रुपेश मोरे,कुणाल मराठे,बबलू शिंदे,कुणाल गायकवाड, विशाल शितोळे,समाधान जाधव,स्वप्नील नेवाळे, दत्ता जरे, नीरज नेवाळे,विजय  लोखंडे, सुदेश लोखंडे,मयूर दोडके,सुरेश भिसे,ऍड.सचिन पवार,चित्रा पवार,प्रतिभा पाटील,सुमन धिंडेलवार,निर्मला भंडारी,विद्या शेवाळे,सविता शेळके,स्वाती बेंद्रे,प्रतीक्षा गुंजाळ, अश्विनी गुंजाळ ,सुनीता गायकवाड,महेंद्र लुगडे,गणेश खरात ,योगेश सोनावणे,योगेश मराठे,वैभव धनलोभे,विशाल खवले,सागर शेंडगे, वैभव मदने,ओमकार ससाणे,राहुल कोळी,रोहन भडके,राहुल खवले ,यश कारले,प्रतीक इंगवले ,धीरज आंब्रे,आकाश कांबळे,सूरज शेंडगे ,कुणाल तवर ,आकाश घोटकुले आदी कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

See also  पूरग्रस्तांना ५ हजाराची मदत नको भरीव रक्कम द्या वाटप त्वरीत व्हावे - माजी आमदार मोहन जोशी