पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे कोथरुड विधानसभेचे कार्याध्यक्ष मा. जयेश संजय मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून बाणेर येथील यश ऑर्केड सोसायटी आणि सुप्रीम एस्ट्राडो सोसायटी येथील ॲमिनिटी स्पेसची स्वच्छता आणि साफ सफाई करण्याचे काम करण्यात आले.
सदर ॲमिनिटी स्पेस मध्ये झाडे झुडपे वाढल्यामुळे या सोसायटी मध्ये राहणाऱ्या नागरीकांना गेल्या अनेक वर्षापासून विंचू काट्याची अडचण निर्माण झाली होती. तसेच पाणी साठत असल्यामुळे डासांचा त्रास होत होता. ही अडचण या परिसरातील नागरिकांनी बाणेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे कोथरूड विधानसभेचे कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांना सांगितली.
यावर त्यांनी जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या वतीने सदर ॲमिनिटी स्पेसची साफ सफाई आणि स्वच्छता करण्याचे काम करण्यात आले.
बाणेर, बालेवाडी आणि परिसरातील नागरिकांची अडचण, समस्या जाणून त्या सोडवण्याचा, त्या समस्या योग्य ठिकाणी मांडून त्याचा पाठपुरावा करून त्याचे निवारण करण्याचा प्रयत्न श्री. जयेश मुरकुटे गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत.
रस्त्याचे खड्डे बुजवण्यापासून, कचरा, स्वच्छता, पथदिवे अशा अनेक समस्या जाणून त्या सोडवल्या आहेत.
या कामामुळे परिसरातील नागरिक काम करणारा माणूस म्हणून जयेश मुरकुटे यांच्याकडे बघत असून त्यांच्या कामाबद्दल येथील नागरिक समाधानी आहेत.
घर Uncategorized राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे कोथरूड मतदार संघाचे कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे...