राजस्थान मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यात भाजपाच्या विजयाचा पुण्यात आनंदोत्सव

पुणे : देशवासीयांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेला विश्वास आणि केलेला विकास हेच भाजपाच्या विजयाचे सूत्र आहे. मोदींवर सर्वसामान्य जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवत भाजपाला राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन ठिकाणी झालेल्या निवडणुकांमध्ये दमदार विजय मिळवून दिला. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील भाजपाचे ४५ हून अधिक खासदार आणि देशातील ३५० हून अधिक खासदार निवडून येतील. विजयाची ही मालिका कायम राहील, असा विश्वास भाजपा यांनी व्यक्त केला.

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यामध्ये झालेली निवडणुकीचा निकाल हाती आला. यामध्ये भाजपाचे दमदार कामगिरी करीत बहुमत मिळवले आहे. यानिमित्त भाजपातर्फे जनसंपर्क कार्यलयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

कोथरूड चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांना पेढे वाटून विजयाचा आनंद साजरा केला.

प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार च्या विकासपर्वाचा हा विजय आहे. सबका साथ, सबका विकास,सबका विश्वास आणि सबका प्रयास या घोषनेनुसार काम करत राष्ट्राला प्रगती पथावर नेणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याचा हा विजय असल्याचे भाजपा चे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर म्हणाले.या विजयात भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे योगदान असून ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रानी सर्वांच्या साथीने रावणाची लंका उध्वस्त केली, रावणाचा अहंकार नेस्तनाबूत केला त्याच पद्धतीने देशातली जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभी असून भारताच्या प्रगतीच्या आड येणाऱ्यांना धूळ चारत आहे.
हा विजय 2024 च्या लोकसभा निवडणुकीची नांदी असून पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत भाजपा आणि मित्रपक्ष 400 चा आकडा पार करतील असा विश्वास देखील संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केला आहे. सोशल मीडिया वर कार्यरत मोदी विरोधकांना ही चपराक असून विरोधकांनी मोदी द्वेषातून केलेल्या गलिच्छ पोस्ट आता तरी डिलीट करावेत आणि मोदी द्वेष सोडून द्यावा असे आवाहन ही त्यांनी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नांतील “जगाचे नेतृत्व” करू पाहणाऱ्या शक्तिशाली भारताच्या निर्मितीच्या आड आता कोणी येऊ नये आणि जनादेशाचा स्वीकार करून रोज उठून गरळ ओकणे बंद करावे असे आवाहन ही संदीप खर्डेकर यांनी केले आहे.

See also  बारामती लोकसभा मतदार संघातील मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संपन्न