सुरक्षा विभागाअंतर्गत नेमण्यात आलेल्या माजी सैनिकांना कायम करण्याची मागणी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी केली

पुणे : सुरक्षा विभागाअंतर्गत नेमण्यात आलेल्या माजी सैनिकांना कायम करण्याची मागणी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदनाद्वारे केली.

पुणे महानगर पालिकेच्या सुरक्षा विभागाअंतर्गत नेमण्यात आलेल्या माजी स्वातंत्र्य सैनिकांची गेली अनेक वर्ष नेमणूक करण्यात आलेली आहे. बहुउद्देशिय पथकात हे कर्मचारी
विविध खात्यात कामे करतात. मध्यंतरी झालेल्या अतिक्रमण खात्याच्या कारवाईत विभाग प्रमुख माधव जगताप यांच्यावर जो हल्ला झाला त्यातून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात हेच रक्षक
मदतीला आले पोलीसही भूमिका घेण्यात कमी पडले तिथे यांची मदत झाली.


कोर्टाच्या निर्णयानुसार या सर्व कर्मचाऱ्यांना कायम करण्याची संधी देणे व कायम करेपर्यंत मानधन तत्वावरून न काढणे इत्यादी निर्देश दिले आहेत असे सागण्यात आले.आगामी भरतीची प्रक्रिया ही क्लार्क या पदासाठी होत असून ती संधी त्या कर्मचाऱ्यांनी घेण्यास ते पात्र नाहीत. तरी सुरक्षा रक्षकांची पदे या स्वातंत्र सैनिकांच्या श्रेणीतून भरण्यात यावी अशी मागणी आमदार मेधा कुलकर्णी यांनी केली. यावेळी माजी सैनिक उपस्थित होते.

See also  प्रत्येक पुणेकराने आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी! पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन