PICT माजी विद्यार्थी अतिंद्रिय सान्याल यांची आंतरराष्ट्रीय यशस्वी कामगिरी – “AI Impact 50” यादीत समावेश

धनकवडी : पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (PICT) च्या उद्योजकता विकास कक्ष (EDC) आणि बिझनेस इनक्युबेशन सेंटरच्या वतीने संचालक डॉ. प्रल्हाद कुलकर्णी आणि प्राचार्य डॉ. संजय गंधे यांनी PICT चे माजी विद्यार्थी आणि यशस्वी उद्योजक श्री. अतिंद्रिय सान्याल यांचे अभिनंदन केले आहे. श्री. सान्याल हे  गेलीलेओ (Gelileo) चे संस्थापक आणि सीईओ आहेत.

गेलीलेओ  या कंपनीचा समावेश आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित “AI Impact 50” यादीत 45 व्या स्थानावर करण्यात आला आहे. यादीत OpenAI, Anthropic, Meta, आणि गुगल सारख्या जगभरातील प्रसिद्ध कंपन्यांसह  गेलीलेओचे नाव समाविष्ट आहे. श्री अतींद्रियो सान्याल यांच्या पुढील वाटचालीस बिझिनेस इंकुबेशन सेंटर तर्फे प्रा. प्रविण पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.


PICT समुदायासाठी हा एक मोठा अभिमानाचा क्षण असून या यशामुळे संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा ठसा जागतिक पातळीवर उमटला आहे.

See also  लोहिया नगर परिसरात स्वच्छता व जलस्त्रोतांची निगा याबाबत जनजागृती रॅली