नऊ दशके भाऊ बहिणीचे नाते जपणारी भेट

पुणे : नऊ दशकांची सोबत भाऊ बहिणीचे नाते जपणार्या भेटीचा दुर्मिळ क्षण मुलांनी नातवांनी अनुभवला. बालेवाडी येथील प्रगतशील शेतकरी दिगंबर बालवडकर व बाजीराव बालवडकर वय अनुक्रमे ९३ व ९५ असलेल्या दोघा भावांनी बहीण बाई विठोबा भोंडवे (रावेत) वय-९१ राखी बांधून घेतली.

दरवर्षी येणारे बहिण तब्येतीच्या कारणामुळे यंदा येणार नसल्याने
जुन्या आठवणींना उजाळा देत दोन्ही भावांनी बहीणीच्या घरी अचानक भेट दिली. रक्षाबंधनाच्या दिवशी आपले जेष्ठ बंधू आपल्या भेटीला येतील याची अपेक्षा बहिणीला नव्हती. अचानक दोन्ही भाऊ आल्यामुळे तीने आनंद व्यक्त केला.

दोन्ही भावांच्या हातावर राखी बांधताना करोडोची संपत्तीपेक्षा अनमोल नात्यांची संपत्तीजवळ असल्याचा आनंद या भेटीमध्ये पाहायला मिळाला. या नव्वदी पार केलेल्या भावा बहिणींना मुले, सुना, नातवंडे, परतुंडे आहेत. मुलांच्या मदतीने अचानक घडवून आणलेली ही भेट यंदाच्या रक्ष बंधनातील महत्त्वाची भेट ठरली आहे.

See also  राजस्थान मधील दोन फरार अतिरेकी पुणे पोलिसांकडून अटक