सुसगाव येथे २४×७ समान पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात माजी शहर सुधारणा समिती अध्यक्ष अमोल बालवडकर यांची पाहणी

सुसगाव : सुस येथे २४x७ समान पाणी पुरवठा योजने अंतर्गत सुरु झालेल्या पाण्याच्या लाईनच्या कामाची_पाहणी केली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातुन काही महिन्यांपुर्वी या कामाचे भुमिपुजन करण्यात आले होते व आता प्रत्यक्षात याकामाची सुरुवात झाली आहे.

हे काम सध्या सुस-म्हाळुंगे गावांच्या हद्दीवर सुरु असुन यामध्ये १८०० मी.लांबीच्या दोन लाईन त्यामध्ये २० इंच व्यासाची ट्रान्समिशन लाईन व ६ इंच व्यासाच्या डिस्ट्रिब्युशन लाईन टाकण्याचे काम आता प्रत्यक्षात सुरु करण्यात आले आहे.


लवकरच या पाईप लाईनचे काम पुर्ण होवुन या नव्याने समाविष्ट सुस-म्हाळुंगे गावांना देखिल समान पाणी पुरवठा करण्यात येईल. या सर्व कामांची माहिती परिसरातील विविध सोसायटींमधील नागरीकांना दिली. यावेळी महानगरपालिकेचे शाखा अभियंता श्री.अशोक सांगडे व ठेकेदारामार्फत प्रोजेक्ट मॅनेजर श्री.शिवाजी साळुंखे यांनी सर्व नकाशांसह परिसरातील नागरीकांना या कामाची माहिती दिली.

यावेळी माजी शहर सुधारणा समिती अध्यक्ष अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर, मा.सरपंच नारायणजी चांदेरे. मा.सरपंच काळुरामजी गायकवाड, मा.सरपंच राजेंद्रजी पाडाळे, मनपा शाखा अभियंता अशोक सांगडे, ठेकेदार प्रोजेक्ट मॅनेजर शिवाजी साळुंखे, सोसायटीमधील विश्वासजी शास्त्री, संदिपजी प्रधान, विजयराव देशपांडे, सुनुल देशमुख, रविंद्र वैद्य व परिसरातील इतर नागरीक उपस्थित होते.

See also  गृहनिर्माण संस्थांमध्ये १०० टक्के मतदार नोंदणीसाठी सदस्यांनी पुढे यावे-मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे