मोदींचे कवच महिला खेळाडूंना नाही तर लैंगिक अत्याच्यार केलेल्या गुन्हेगार भाजपचे खासदार बृजभूषण सिंग ला आहे :- आ. प्रणिती शिंदे

बृजभूषण सिंग ला अटक करण्याच्या मागणीसाठी प्रदेश कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन

मुंबई : महिला कुस्तीपटुवर लैंगिक अत्याच्यार करणारा आरोपी भाजप खासदार बृजभूषण सिंग अटक करण्याच्या मागणीसाठी तसेच महिला खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी, केंद्र सरकार आणि पोलिसांकडून झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी पुतळा मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अनिशा बागुल, प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष चारुलता टोकस, युवक काँग्रेसच्या शिवानी वडेट्टीवार प्रदेश सरचिटणीस उत्कर्ष रूपवते, नीता त्रिवेदी, नवी मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुदर्शन कौशिक आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, भाजपचे खासदार बृजभूषण सिंग यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे आहेत, देशाचे नाव जगात उज्वल करणाऱ्या अनेक महिला कुस्तीपटूवरच त्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा या महिला खेळाडू सांगत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने त्याच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. अल्पवयीन खेळाडू वरील अत्याचार केल्याप्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हाही दाखल झाला असूनही त्याला अटक होत नाही. मोदी सरकार बृजभूषण सिंग याला वाचवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कवच या महिला कुस्तीपटू साठी नसून स्वतःच्या पक्षाच्या गुन्हेगार खासदार बृजभूषण सिंगला वाचवण्यासाठी आहे अशी घाणागाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. भृजभूषण सिंग ला ताबड़तोब अटक करून कड़क कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

या आंदोलनात महिला काँग्रेसच्या उज्वला साळवे, रूपाली कापसे, पुनम पाटील, जानवी देशमुख, वैशाली भोसले, निर्मला म्हात्रे, कांचन कुलकर्णी, प्रवीण चौधरी, श्रद्धा ठाकूर, रूपा पिंटू, रुकसानाजी यांच्यासह महिला काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वसुंधरा अभियान बाणेर संस्थेच्या माध्यमातून एक हजार झाडांचे वृक्षारोपण