पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘‘संविधान दिन’’ साजरा

पुणे : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेस भवन येथे भारतीय संविधानाचे पुजन करून ‘‘संविधान दिन’’ साजरा करण्यात आला.


संविधान दिनानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांना संविधानाच्या मुखपृष्ठाची फ्रेम महिला पदाधिकारी सौ. अनिता धिमधिमे यांनी काँग्रेस भवन येथे भेट दिली.


यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘संविधानाने या देशामध्ये सर्व धर्मिय लोकांना मानव म्हणून जगण्याचा अधिकार दिला. १९४७ च्या स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये संविधानाने सरकार स्थापन झाल्यानंतर हे संविधान सांभाळण्याचे काम व संविधानाने देश चालविण्याचे काम हे काँग्रेस पक्षाने केले. महात्मा गांधींच्या दूरदृष्टीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या जगविख्यात विद्वानाने या देशाची घटना तयार करून या देशाच्या जडण घडणीला सुरूवात केली. आज सर्वधर्मांचे ग्रंथ जेवढे पवित्र आहेत त्याचपध्दतीने संविधानालाही सर्वधर्मिय ग्रंथ म्हणून पुजले गेले पाहिजे. संविधान हा या भारताचा आत्मा असून यासाठी सर्व देशातील देशप्रेमींनी एकत्र येऊन जाती पाती व धर्मा धर्मातील द्वेष विसरून देशाच्या प्रगतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. हेच खरे संविधान वाचविण्यासाठीचे उचित कार्य ठरेल.’’ 


यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर, संदिप मोकाटे, हेमंत राजभोज, राज अंबिके, दिलीप लोळगे, सचिन सावंत, सुरेश नांगरे, अनिल धिमधिमे, सचिन भोसले, अदनार शेख, आशिष वाघमारे, अमिर सय्यद, अक्षय बहिरट, विजय हिंगे, मुन्ना खंडेलवाल, पोर्णिमा बहिरट, कल्पना शंभरकर आदी उपस्थित होते.

See also  पाषाण रोड येथील विघ्नहर्ता चौकामध्ये भर दिवसा बस स्टॉप चोरी नागरिकांच्या सजगतेने थांबली