मंदिरे ब्राह्मण मुक्त करण्याची वेळ आल्याचा इशारा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषाेत्तम खेडेकर

पुणे : छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयाेगिताराजे यांना नाशिकच्या काळाराम मंदिरातील प्रकरणात आता मराठा सेवा संघाने उडी घेतली आहे. संघाने निषेध नाेंदविला असून, मंदिरे ब्राह्मण मुक्त करण्याची वेळ आल्याचा इशारा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषाेत्तम खेडेकर यांनी दिला आहे. 


राम नवमीनिमित्ताने संयोगिताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात गेल्या हाेत्या. तिथं मंदिरात पूजा केली. मंदिराच्या महंतांनी पूजा पुराणोक्त पद्धतीनं करण्यास सुरुवात केली. मात्र संयोगिताराजे छत्रपती यांनी या पूजेला विरोध दर्शवला. त्यांनी महंतांना पूजा वेदोक्त पद्धतीनं करण्यास सांगितले. मात्र त्यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे महंतांनी सांगितले. संयोगिताराजे छत्रपती यांनी तसा दावा केला आहे. याबाबत सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट देखील टाकली होती. यावरून वाद निर्माण झाला आहे. 


नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या वंशज असलेल्या संयोगिताराजे भोसले यांच्यासोबत  जो प्रकार घडला त्याचा निषेध मराठा सेवा संघ करत असल्याचं अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटले आहे. तसेच आता मंदिरे ब्राह्मणमुक्त करण्याची वेळ आली आहे, ब्राह्मणांच्या ऐवजी मंदिरात बहुजन सामजातील मुला-मुलींची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. खेडेकर यांच्या या वक्तव्यानं आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

See also  मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या जन्माच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त निमित्त सांगीतिक मानवंदना