पुणे : पुणे शहरात ४६ भाजी मंडई पुणे महापालिका ने नागरिकांच्या करांच्या (टॅक्स) पैशातून बांधल्या आहेत. नागरिकांच्या कष्ठाचे शेकडो कोटी रुपये खर्च केले आहेत पण या वास्तू नागरिकांसाठी वापरात आणल्या नाहीत. अनेक भाजी मंडई बंद आहे, त्या ठिकाणी दिवस रात्र मद्यपी दारू पिताना, पत्ते खेळताना आढळतात. अनेक ठिकाणी अनधिकृत व्यवसाय चालू आहेत किंवा स्थानिक लोकप्रतिनिधीने मालमत्तेवर कब्जा केला आहे. संबंधित विषयाची सखोल चौकशी व्हावी आणि मंडई नागरिकांसाठी ताबडतोप सुरु करण्यात याव्यात अशी मागणी पुणे मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
भाजी मंडई चालू नसल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे, उन्हात, पावसात उभा राहून रस्त्यावर, फुटपाथ वर भाजी विकत घ्यावी लागते. अधिकृत भाजी मंडई चालू नसल्यामुळे, फुटपाथ वर विक्रीते बसलेले असतात, त्यामुळे ट्रॅफिक जॅम, पादचाऱ्याला चालण्यास अडथळा येतो.
अनेक भागात सुसज्य भाजी मंडई बंद करून स्थानिक लोकप्रतिनिधीने आठवडी बाजाराचा सुळसुळाट चालू केला आहे, चौका चौकात आठवडी बाजार भरवला जातो आणि प्रत्येक भाजी विक्रेत्याकडून पैसे घेतले जातात याचा परिणाम म्हणजे नागरिकांना वाढीव दरात भाजी विकत घ्यावी लागते. पालिका अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने अधिकृत भाजी मंडई बंद करून आठवडी बाजाररातून नागरिकांची लूट करण्यात येत आहे.
आम आदमी पार्टी ची मागणी आहे कि प्रत्येक भाजी मंडई ची सद्यःपरिस्थती काय आहे ? आणि ती बंद काय आहे याची माहिती द्यावी. नागरिकांना हक्काची दिवसाचे किमान १२-१५ तास सुरु असलेली भाजी मंडई उपलब्ध करून देणे हे पालिकेचे कर्तव्य आहे. पुणे मनपा आयुक्त यांनी प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर बंद भाजी मंडई चालू कराव्यात अन्यथा आम आदमी पार्टी आपल्या दालनासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी दिला.
घर ताज्या बातम्या पुणे शहरातील महापालिका मालकीच्या आणि नियंत्रित सर्व भाजी मंडई चालू करण्याची आपची...