सुस म्हाळुंगे ग्रामस्थांचा NH7 विकेंडर कार्यक्रमास विरोध

सुस म्हाळुंगे  : सुस-म्हाळुंगे येथे दिनांक 14/12/2024 रोजी आयोजित NH7 विकेंडरच्या माध्यमातून प्रसिद्ध गायक आणि कलाकारांचा कार्यक्रम होणार आहे. मात्र, या कार्यक्रमामुळे स्थानिक ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे सुस म्हाळुंगे ग्रामस्थांचा NH7 विकेंडर कार्यक्रमास विरोध दर्शवला आहे. याबाबत बावधन पोलीस स्टेशन येथे ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या कार्यक्रमामुळे रस्ते वाहतूक कोंडी होऊन दैनंदिन प्रवासात मोठा अडथळा येत आहे. याशिवाय, मोठ्या आवाजाच्या स्पीकर्समुळे होणारा त्रास आणि मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांमुळे अपघातांची शक्यता वाढत आहे. तसेच, आपत्कालीन सेवांना (जसे की रुग्णवाहिका व अग्निशमन दल) यामुळे योग्य वेळी पोहोचता येत नसल्यामुळे संभाव्य जीवितहानीची भीती व्यक्त केली जात आहे.

परवानगी रद्द करण्याची मागणी उपसरपंच अनिकेत चांदेरे व गावकऱ्यांनी बावधन पोलीस निरीक्षकांकडे लेखी स्वरूपात विनंती केली आहे की, या कार्यक्रमाला कोणतीही परवानगी देऊ नये. त्यांनी या कार्यक्रमामुळे स्थानिकांच्या शांततेला धोका निर्माण होत असल्याचे स्पष्ट केले आहे.पोलीस प्रशासन या प्रकरणावर काय कारवाई करते, याकडे स्थानिक ग्रामस्थांचे लक्ष आहे.

तसेच महाळुंगे गावचे माजी सरपंच मयूर भांडे यांनी देखील बावधन पोलीस स्टेशन येथे निवेदन देत कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे.

See also  शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा - स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे