पुणे: पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (PICT) च्या Neural_Nexus टीमने स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2024 स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून ₹1,00,000 चे बक्षीस जिंकले आहे. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या सहभागातून अंतिम फेरीत पोहोचलेल्या टीमने आपल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाद्वारे सर्वोत्कृष्ट ठरून संस्थेचे नाव उज्ज्वल केले.
टीमचे सदस्य परम प्रशांत जोशी (ई. & टी.सी.), ईशा शहा (AIDS), सारा नमबियर (C.E.), अथर्व कुलकर्णी (E.C.E.), श्री मेघ शेट्टी (C.E.), आणि निकिता भेडसगावकर(AIDS) यांनी समाजोपयोगी समस्यांवर आधारित अभिनव प्रकल्प तयार केला. या यशामध्ये डॉ. जी. पी. पोतदार यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले.
PICT चे प्राचार्य प्रा. एस. टी. गंधे आणि संचालक डॉ. पी. टी. कुलकर्णी यांनी टीमचे अभिनंदन केले आणि त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. त्यांनी हे यश संस्थेच्या नाविन्यपूर्ण संशोधन आणि तांत्रिक सर्जनशीलतेच्या परंपरेचे प्रतीक असल्याचे सांगितले.
Neural_Nexus टीमचे हे यश PICT च्या शैक्षणिक कामगिरीचा गौरव वाढवणारे ठरले आहे. त्यांनी साकारलेला आदर्श इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.