बाणेर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथ मराठा समाजाचा जल्लोष; मनोज जरंगे पाटील यांच्या भगिनी देखील सहभागी

बाणेर : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनाला प्रतिसाद देत सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या. या यशाचा आनंद उत्सव औंध बाणेर बालेवाडी पाषाण सुस महाळुंगे सुतारवाडी सोमेश्वरवाडी आदी गावातील नागरिकांनी साजरा केला.

यावेळी पाटील यांच्या भगिनी सौ. शोभा वाघराळ (जरांगे पाटील) आणि सौ. गीता गावंडे (जरांगे पाटील) ह्या आपल्या मराठा समाजाच्या विजयानिमित्त आपल्या बाणेर गाव श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते आपल्या सर्व गावांच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना हार अर्पण करण्यात आला.

यावेळी मराठा समाजाच्या वतीने फटाक्यांचे वाजविण्यात आले. तसेच पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी गुलाल उधळत जरांगे पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच शासनाने कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. यावेळी बाणेर बालेवाडी सुस महाळुंगे पाषाण सुतारवाडी सोमेश्वर वाडी औंध परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  सुतारवाडी महामार्ग लगत अतिक्रमण कारवाईत सुमारे 3 लाख चौरस फुट बांधकाम पाडण्यात आले.