धनकवडी : चंद्रागण सोसायटी फेज 7 आंबेगाव पठार भारती विद्यापीठ मागे एका लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे त्यात तो जबर जखमी झाला आहे. मुलाला किमान ४० हून टाके पडले आहे.
रस्त्यावरून जात असताना लहान मुलाला भटक्या कुत्र्यांनी चावा घ्यायला सुरुवात केली. यामध्ये जबर जखमी झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावरती खाजगी भारती विद्यापीठ हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.
आंबेगाव पठार परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री आहेत. यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावर करावे लागते. लहान मुलांवरील कुत्र्याच्या हल्ल्याच्या घटनेनंतर प्रायव्हेट डॉग रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. यावेळी शेकडो नागरिक कार देखील कुत्र्यांना पकडून देण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. यानंतर काही कुत्री पकडून देण्यात आली. प्रशासनाने या गंभीर घटनेची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
