महर्षी नगर गुलटेकडी येथील पंचशिल बुद्ध विहार व जय भिम तरुण मंडळ आयोजित धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा

गुलटेकडी : महर्षी नगर गुलटेकडी येथील पंचशिल बुद्ध विहार व जय भिम तरुण मंडळ आयोजित धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त बुद्ध वंदना व खीर वाटप कार्यक्रम घेण्यात आला. भाजपा झोपडपट्टी आघाडी अध्यक्ष गणेश शेरला यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रमाचे सुरुवात झाली.


धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या शुभेच्छा नागरीकांना यावेळी देण्यात आले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व बौद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नंतर उपस्थित त्यांना खीर वाटपा कार्यक्रम करून अनेक नागरिकांना गोड खीर धम्मचक्र दिनानिमित्त भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते रूपेश सरोदे व लिलीत सरोदे यांनी केले कार्यक्रमाचे सुंत्रसंचलन बाळासाहेब शेलार यांनी केले.यावेळी समरसता मंचाचे अरुण कचरे ,डाँ प्रसाद खंडागळे, राहुल लोंढे, सागर निंबाळकर, राजू ओव्हाळा व गुलटेकडी भागातील बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थीत कार्यक्रम संपन्न झाला

See also  अपंग निराधार नागरिकांना दीपावली फराळाचे वाटप