नियमांचे उल्लंघन करून सर्वे नंबर 137/2 मधील सुरू असलेल्या बाणेर पाषाण लिंक रस्त्यावरील बांधकाम थांबवण्याचे पुणे मनपा बांधकाम विभागाचे आदेश

बाणेर : बाणेर पाषाण लिंक रोड येथील सर्वे नंबर १३७/२ सिटी सर्वे नंबर 21 35 मधील बांधकाम व्यवसाय शरद दत्तात्रय बाळ व आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी यांना सदर जागेत सुरू असलेले बांधकाम थांबवण्याचे आदेश पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत.

पाषाण बाणेर लिंक रस्त्यावरील सर्वे नंबर १३७/२ मधील सुरू असलेल्या बांधकामाला पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी व सुरक्षा उपाययोजना राबवल्या नसल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड च्या वतीने बांधकाम परिसरात होत असलेल्या हवेचे प्रदूषण या संदर्भात २/११/२०२३ रोजी निर्देशाचे उल्लंघन होत असल्या प्रकरणी पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीने निदर्शनास आले होते.
सदर बांधकामावर महानगरपालिकेच्या अधिनियम चे कलम 267 (१) ब महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 54 नुसार बांधकाम विभागाच्या वतीने कारवाई करत बांधकाम बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बांधकाम अभियंता सुनील कदम यांनी दिनांक 13 /12 /2024 रोजी सदर बांधकाम व्यवसायिकांना बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले असून बांधकाम न थांबवल्यास पोलीस कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

रात्री अपरात्री बांधकाम सुरू ठेवून मोठमोठ्याने आवाज सुरू असल्याने अनेक नागरिकांनी या बांधकामाविषयी तक्रारी दाखल केल्या होत्या. तसेच सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून हवेचे प्रदूषण देखील या परिसरात होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. यानुसार सदर बांधकामावर कारवाई करण्यात आली असून बांधकामावर काम सुरू असल्याची पाहणी देखील पालिकेच्या वतीने करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत. याबाबत रोहन कोकाटे यांनी देखील कारवाई करण्याची मागणी सातत्याने केली होती.

See also  फुरसुंगी,उरुळी देवाची गावे पुणे महानगरपालिकेतून वगळणार : अशी असणार म्हणून पुणे महानगरपालिकेची नवी हद्द